चंद्रपूर - दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ ला दुर्गापुर डब्ल्यू. सी.एल. कॉलनीत वनविभागाच्या उच्चस्तरीय अधिकार्यांसह, मा. के. के. सिंह साहेब व नितीनभाऊ भटारकर यांनी जिल्हा परिषद शाळेच्या परिसराची पाहणी केली.
Wildlife animal
सदर शाळेत शिकत असलेल्या लहान विद्यार्थ्यांपेक्षा उचं व मोठ्या प्रमानात कचरा असल्याने या जागेवर Leopard दबा धरून बसण्याची भिती वनविभागाने व्यक्त केली असल्याने तात्काळ विद्यार्थ्यांना तीन दिवसांची सुट्टी देऊन सदर परिसराच्या बाहेरील व आतील कचरा साफ करण्याचे निर्देश WCL प्रशासनाला दिले.
Panic of wild animals
त्या अनुषंगाने दुर्गापूर ग्रामपंचायत सरपंच सौ, पूजाताई मानकर, माजी सरपंच अमोल भाऊ ठाकरे, सचिन भाऊ मांडाले, मनोहरजी भांडवलकर, सौ सुनंदाताई टोंगे, निखिल भाऊ हस्ते, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलाकर जी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्रतीक भांडवलकर, आसिफ खान पठाण पवन बंडीवार गणेश यादव यांच्या उपस्थितीत शाळेच्या परिसराच्या संपूर्ण साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
