News34 Gadchandur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरोना असो किंवा अन्य कोणतेही कारण असो रक्ताची आवश्यकता कायमच भासते. तेव्हा रक्तदान व रोगनिदान शिबिराचे आयोजन करणे काळाची गरज बनली आहे. दैनांदिन जीवनात प्रत्येकजण आपापल्या आरोग्याची काळजी घेत असतात,अनेकदा काही कारणाने दुर्लक्ष ही होते.
नागरिकांनी अशा रोगनिदान शिबिराचा लाभ घेण्याची गरज असून अशाप्रकारच्या शिबिरांमुळे मानव सेवेचे दर्शन घडत असल्याचे मत राजूरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य कोरपना तालुका जनरल मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशन,नगरपरिषद गडचांदूर,आ.वि.भावे संचालित सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल Cancer Hospital व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंंगी मेघे(वर्धा)व Wildlife Environment Conservation Naturing Foundation गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 18,19 फेब्रुवारी या दोनदिवसी मोफत रोगनिदान व रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. Blood donation camp
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशन तालुकाध्यक्ष डॉ.प्रदीप खेकडे होते तर आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.गडचांदूरचे ठाणेदार सत्यजित आमले,नगराध्यक्षा सविता टेकाम,काँग्रेस तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, न.प.सभापती सौ.कल्पना निमजे,गटनेता विक्रम येरणे, सभापती राहूल उमरे,नगरसेविका सौ.जयश्री ताकसांडे,नगरसेवक रामसेवक मोरे,व्यापारी असोसीएशन अध्यक्ष हंसराज चौधरी,समाज सेवक मनोज भोजेकर,आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघेचे डॉ.विवेक लहाने,डॉ. ओजस महाजन, डॉ.पवार, जिल्हा समन्वयक डॉ.सत्यजित पोद्दार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच डॉ.असोसिएशनचे डॉ.प्रदीप ठाकरे, डॉ.कुलभूषण मोरे,डॉ. प्रविण लोनगाडगे इतर तसेच विकॅनचे अध्यक्ष प्रितेश मत्ते, वैभव राव, प्रणित अहिरकर सह इतरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन दिपक खेकारे, प्रास्ताविक डॉ.मोरे,आभार डॉ.लोनगाडगे यांनी व्यक्त केले. शिबिरात हृदय रोग तज्ञ डॉ.लहाने,डॉ. महाजन यांनी हृदयरोग,बीपी,शुगर,ईसीजी तपासणी व canced रुग्णांवर उपचार केले.तसेच दंतरोग तज्ञ डॉ.पवार, डॉ.ढोके,डॉ.मंदे डॉ.विपूल गिरडकर,डॉ.काळे यांनी दंतरोग उपचार केले. शिबिरात एकूण 310 जणांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.18 फेब्रुवारी रोजी डॉ.खेकडे यांच्या दवाखान्यात आयोजित सदर रोगनिदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.याप्रसंगी आमदार धोटे यांच्या हस्ते कोरपना तालुका General Medical Practitioner असोसिएशन गडचांदूर कार्यालयाचे उद्घाटन तसेच वार्षिक अंक बुकलेट आणि कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. डॉ.असोसिएशनतर्फे रूग्ण तपासणी केंद्र हॉल, सभागृह मिळावा तसेच विकॅन फाउंडेशनसाठी वाचनालय इमारत द्यावी या मागणीचे निवेदन यावेळी आमदार धोटे यांना देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. असोसिएशन, विकॅनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
