चंद्रपूर/दुर्गापूर - चंद्रपूर जिल्हा हा प्रदूषणाने वेढला असून सध्या वेकोली, वीज केंद्रामार्फत प्रदूषण सुरू असून शहरात सर्वदूर धुळीचे वातावरण पसरले आहे.
सध्या ग्रामपंचायत उर्जानगर परिसरातील वार्ड क्रमांक 5 येथील एलटी बंकर असून त्यातून मोठ्या प्रमाणात धूळ निघत असून सदर धुळीने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. Pollution
त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरी सर्वदूर धूळ जमा होत आहे, सदर धुळीने दमा, त्वचेचे आजार सारख्या बिमारी होत असून यावर आळा घालावा या आशयाचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या माध्यमातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आले होते. Wcl
सिटीपीएस चे क्रमांक 1 व 2 चे संच कालबाह्य झाल्यामुळे बंद करण्यात आले होते, तसेच 3 व 4 क्रमांक चे संच कालबाह्य होण्याच्या तयारीत असून कोळसा पुरविणारे रोप वे व एलटी सुद्धा कालबाह्य झालेले आहेत. Ctps thermal power
मात्र आज पद्मापुर कोळसा खाणी मधून कोळश्याचा पुरवठा होत आहे, पण सदर कोळश्याचा पुरवठा हा वाहनाने होत आहे त्यामुळे निघणारा धूर हा मानवी आरोग्याला धोका निर्माण करीत आहे सदर बाब गंभीर स्वरूपाची असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना निवेदन देण्यात आले. Shivsena chandrapur
निवेदन प्राप्त झाल्यावर संदीप गिर्हे यांनी उर्जानगर परिसरातील प्रदूषित जागेची पाहणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करे यांच्या सोबत पोहचले.
शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे व करे यांनी परिसरातील प्रदूषण बघितले, व वेकोली आणि वीज केंद्रातील अधिकाऱ्यांना प्रदूषित जागेवर तात्काळ सम्पर्क साधत बोलाविण्यात आले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करे यांनी सदर प्रदूषण हे अत्यंत गंभीर असून यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश वेकोली व वीज केंद्रातील अधिकाऱ्यांना दिले, उपाययोजना न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. Chandrapur news
वेकोलीच्या प्रदूषित करणाऱ्या जागेवर सध्या एकंच वॉटर स्पेअर असून पुन्हा 5 वॉटर स्पेअर बसविण्यात येणार असल्याची तयारी वेकोली अधिकाऱ्यांनी दाखविली.
यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचे आभार मानले.
