चंद्रपूर - 13 फेब्रुवारीला मुंबई येथील टिळक भवन दादर येथे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी च्या वतीने उत्तर भारतीय सेल कांग्रेसचे पदवाटप सोहळा आयोजित करण्यात आला होता. Uttar bhartiya cell congress
चंद्रपूर उत्तर भारतीय सेल चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदी कांग्रेस कार्यकर्ते प्रमोद श्रीवास यांची नियुक्ती करण्यात आली. Chandrapur congress
सदर नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण, उत्तर भारतीय सेल चे अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांची उपस्थिती होती.
प्रमोद श्रीवास यांच्या नियुक्तीवर चंद्रपूर चे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महानगर अध्यक्ष रामू तिवारी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख व कांग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय यांनी अभिनंदन केले आहे.

