चंद्रपूर - शहरातील वडगाव परिसरात अस्वलीची दहशद पसरली आहे. गेल्या तीन दिवसा पासून एक Bear आपल्या एका पिल्ला ला घेऊन वडगाव परिसरातील आंबेडकर सभागृह मार्गावरील शिव नगरात रोज संध्याकाळी फिरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. Wild animal
रोज ती अस्वल 8 , 10 वाजताच्या सुमारास या परिसरातून आपल्या पिल्ला सह मुक्त संचार करत आहे. या अस्वलीची छायाचित्र कॅमेरा मध्ये कैद झालं आहे. घटनेची माहिती वडगाव परिसरातील नगरसेवक पप्पू देशमुख यांना देण्यात आली. माहिती मिळताच देशमुख यांनी वनविभागाला घटना स्थळी बोलावून अस्वलीला पडवून लावलं आणि वन विभागाला या परिसरात रोज Petroling करण्याची विनंती केली. तसेच परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलं आहे.
चंद्रपुरात वाघाच्या दहशती नंतर आता नागरिकांचा सामना अस्वली सोबत होणार असून नागरिकांनी सायंकाळच्या सुमारास बाहेर पडल्यास सतर्क राहावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.
