चंद्रपूर/दुर्गापूर - बुधवारी रात्री च्या सुमारास 52 वर्षीय भोजराज मेश्राम यांना वाघाने ठार केले होते, सदर घटनेनंतर राजकीय पक्षांनी वीज केंद्र व वनविभागावर ताशेरे ओढले. Leopard attack
सदर घटना ताजी असताना पुन्हा दुर्गापूर नेरी येथे राहणारा 16 वर्षीय मुलगा राज भडके याला बिबट्याने उचलून नेल्याची घटना गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडल्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. Breaking news
दुर्गापूर ग्रामपंचायत च्या मागील भागांत राज हा जात असताना अचानक बिबट्याने त्यांचेवर हल्ला केला, घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस व वनविभागाच्या चमूने शोधकार्य सुरू केले आहे.
वनविभागाच्या ढिसाळ नियोजनाविरोधात राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे, वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्यात वनविभाग पूर्णतः अपयशी ठरले आहे असा ठपका सुद्धा भटारकर यांनी वनविभागावर ठेवला आहे.
