News34 mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल येथील जुन्या रेल्वे लाइन जवळ नगर परिषदेने नव्याने बांधकाम करण्यात येत असलेल्या संकल्पित बगीच्या समोर जागेवरच उभा असलेला मॅजिक आटोच्या आतून धूर निघून पेट घेतल्याने पोट भरणाऱ्या आटो चालकाचे खूप आर्थिक नुकसान झाले. ही घटना दिनांक २८/१/२०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.
रवि कल्लुरवार यांच्या मालकीची टाटा मँजीक tata magic (MH34-D-2455) गाडी बंद असताना अचानक पेटली. आजू बाजूचे आटो चालक धाऊन जाऊन रेती पाणी टाकून विझवण्यासाठी प्रयत्न केला परंतु आगीचा भडक चांगलाच भडकला होता. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले परंतु नगर परीषदेचे अग्नीशमन पथकाचा अजुनही पत्ताच नाही. घटनेमूळे पुन्हा एकदा नगर प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.
