प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - 6 जानेवारी 1832 ला इंग्रजी व मराठी भाषेतील मजकूर असलेला Darpan दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला, या दिवशी Balshastri Jambhekar आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा वाढदिवस असल्याने हा दिवस राज्यभरात Journalist Day पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधत बल्लारपूर महाराष्ट्र पत्रकार संघाचा वर्धापन दिन व सामाजिक, शिक्षण, उद्योग, राजकीय, शासकीय व इतर क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आज सायंकाळी 6 वाजता बहुउद्देशीय समाज मंदिर, कॉलरी गेट, श्री टॉकीज समोर आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमात Zee Media झी मीडिया चे चंद्रपूर-गडचिरोली चे जिल्हाप्रतिनिधी आशिष अंबाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष, उदघाटक म्हणून बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून विजय सोरते, डॉ. प्रशांत राऊत, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य पद्माकर पांढरे, सुरेश रामगुंडे उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमाला नागरिक व निमंत्रितांनी कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहण्याचे आवाहन बल्लारपूर तालुकाध्यक्ष रमेश निषाद, सचिव अजय रासेकर, उपाध्यक्ष विकास राजूरकर, कोषाध्यक्ष पारिष मेश्राम, सहसचिव विवेक गडकर, प्रशांत भोरे, ज्ञानेंद्र आर्य, प्रशांत विघ्नेश्वर व अनेकेश्वर मेश्राम यांनी केले आहे.