चंद्रपूर - ब्रेकिंग न्यूज च्या मोहात अनेक बातमीपत्राची शहानिशा न करता पत्रकार बातम्या लावण्यासाठी एकच खटाटोप करतात, वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया व आता सर्वात जलद वृत्तसेवा म्हणजे news portal, या वेगवान जगात आज सर्वात पुढे news portals गेले आहे.
काही दिवसांपूर्वी एका हरण चा व्हिडीओ व्हायरल झाला त्याच्या गरूडझेपेने सर्वांचे मन मोहून टाकले मात्र तो व्हिडीओ नेमका कुठचा याची शहानिशा कुणी केली नाही. Virul video
तो व्हिडीओ चंद्रपुरातील जुनोना तलावजवळील आहे, असे वृत्तही अनेकांनी प्रकाशित केले, तो व्हिडीओ कुठला आहे हे आम्ही या बातमीच्या माध्यमातून प्रकाशित करीत आहोत. Fake news
सदर व्हिडिओ मध्ये पाणी पिण्यासाठी तलावा जवळ हरण आला मात्र त्यावेळी काही कुत्रे त्याच्या मागे लागले व आपला जीव वाचविण्यासाठी त्या हरनाने गरुड झेप घेतली.
हा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद झाला व लगेच समाजमाध्यमात व्हायरल होऊ लागला.
३० डिसेंबर २०२१ चा दिवस. भागीमहारी येथील काही तरुण फिरायला आली होती. त्याच वेळी या परिसरातील हरिण तलावावर पाणी प्यायला आली. गावातीलच कुत्र्यांनी तिचा पाठलाग केला. त्यावेळी आपला जिव वाचविण्याकरीता हरिणीने भागीमहारी तलावाचा पारीवरून झेप घेतली. त्यावेळीचा हा प्रसंग पत्रकार देवानंद शेंडे यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यांनीच सर्वप्रथम फेसबुक आणि YouTube वर अपलोड केला.
देवानंद शेंडे यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्कासाठी
+91 88882 87548
हा हरणीचा विडीओ भागीमहारी पर्यटनस्थळ येथील तलावावरील आहे. भागीमहारी हे गाव नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी चोही दिशेने हिरवळ असलेले भागीमहारी म्हणजे वन्यप्राण्यांसाठी हक्काचे ठिकाण. येथे दर शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक येत असतात. येथील जंगलात जवळपास 300 च्या जवळपास हरण, सांबर, चिकारा, निलगाय आहे. येथे येणारे पर्यटक पार्टी करण्याचा बेताने इथे येत असतात. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे गावातील बरीचशी कुत्रे या परिसरात असतात.
