प्रतिनिधी/गुरू गुरनुले
चंद्रपूर : भंडारा जिल्ह्यातील जि. प. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी 'मी मोदींना मारू शकतो I can kill Modi आणि शिव्याही देऊ शकतो' अश्या प्रकारचे Controversial statement वादग्रस्त विधान दि. 16 जानेवारी 2022, रोजी साकोली येथे केले.
देशाच्या सन्माननीय पंतप्रधानाबद्दल असे घृणास्पद वक्तव्य केल्याच्या विरोधात जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले व भाजपा कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध केला. तसेच त्याविरुद्ध पो. स्टे. मूल येथे तक्रार नोंदवली आहे.
यावेळी बोलतांना जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी,'मी नाना पटोले यांच्या घृणास्पद वक्तव्याचा जाहीर निषेध करते व काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविणाऱ्या व्यक्तीला असे घृणास्पद वक्तव्य शोभा देत नाही. देशाचे पंतप्रधान हे देशातील एक मोठे संविधानिक पद आहे. त्यांच्याबाबत बोलतांना अदबीने बोलायला पाहिजे. म्हणून मी नाना पटोले यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करते' असे सांगितले.
याप्रसंगी नंदकिशोर रणदिवे (माजी उपाध्यक्ष, न. प. मूल), प्रशांत समर्थ (माजी नगरसेवक), प्रशांत लाडवे (माजी नगरसेवक), चंद्रकांत आष्टनकर (माजी नगरसेवक), चंदू नामपल्लीवार, सुरज मांदाडे, राकेश ठाकरे, प्रशांत बोबटे, रुपेश निकोडे व मूल भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
