चंद्रपूर - अस्पायर (Aspire) प्रोफेशनल अॅकॅदमी ,चंद्रपुूर च्या वतीने आयोजित Annual Day 2022 चा सोहळा नुकताच पार पडाला. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा. निलेश बेलखेडे, युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपुर हे होते त्यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना neet निट, jee जेईई व स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना कुठल्या गोष्टींची गरज असते, परिक्षेला समोर जातांना स्मरण शक्ति वाढवून स्वतः चा आत्मविश्वास कसा उंचवावा, तसेच डाॅक्टर, इंजीनियर व विविध शासकीय नौकरी मिळविल्यानंतर ही समाजाच्या इतर गरजू घटकांपर्यंत पोहोचवून मदती साठी सहकार्याची भावना मनात बाळगून आपले सामाजिक कर्तव्य सुद्धा पार पाडावे याकरिता फक्त शिक्षीत म्हणून न राहता सुशिक्षित बना व चांगला समाज घडवण्यासाठी योगदान द्या असे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व अतीथी म्हणून युवासेना चिटणीस नगाजी गनफाडे व इतर प्राध्यापक वर्ग मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या वेळी बारावी विद्यार्थ्यांना शिल्ड देऊन त्यांना परीक्षेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. सोबतच अस्पायर प्रोफेशनल अॅकॅदमी ,चंद्रपुूर येथे अभ्यास करून SRPF च्या परिक्षेमध्ये मध्ये उतीर्ण झालेल्या किसन मडावी या विद्यार्थ्यांला संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ ,शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. युवासेना शहर चिटणीस यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्या पुढील यशस्वी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सर यांनी बोलतांना संस्थेच्या आजवरच्या प्रवासाबाबत व मिळालेल्या रिझल्ट बाबत सांगितले व यापुढे हि विद्यार्थ्यांना फक्त संस्था हि फक्त पैसै कमविण्यासाठीचे साधन न राहता शक्य तेवढी मदत गरिब गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येईल व चांगले विद्यार्थी या चंद्रपुर जिल्ह्यातून या चंद्रपुर चे नाव लौकिक करेल असा मानस व्यक्त केला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले.
