गडचांदूर :- नांदाफाटा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य गेट समोर भर चौकातील एका इलेक्ट्रिक दुकानात चोरी theft झाल्याची घटना 22 जानेवारी रोजी सकाळी उजेडात आली आहे.या संबंधी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक करून चोरीचा माल हस्तगत केला असून दूसरा आरोपी फरार आहे. गावातील सर्वात सुरक्षित ठिकाणी दूकानात चोरी झाल्याने समस्त व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर चोरांनी दुकानाचे कुलूप तोडून अंदाजे 25 ते 30 हजाराचा माल लंपास केला असून रात्रीच्या सुमारास चोरीचा माल नेताना चौकात झोपलेल्या काही लोकांनी चोरांना बघीतले.त्यांनी चोरांची नावे आणि ओळख सांगितली असता काही जागरूक नागरिकांनी त्यांच्या घरी जाऊन चोरी करणाऱ्या पैकी एका अल्पवयीन मुलाला पकडले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे घरी जाऊन अंदाजे 25 हजार किमतीचा कॉपर वायरचा बंडल हस्तगत केला.चोर सापडल्याची वार्ता ऐकून लोकांनी चौकातील त्या दुकानात एकच गर्दी केली होती.घटनेची माहिती मिळताच नांदा फाटा येथील पोलिस हवालदार नागोबा बुऱ्हान यांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन गडचांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास व दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
------------//------
नांदाफाटा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य गेटवर security guard सुरक्षा रक्षक असतो.आणि या चौकाच्या हाकेच्या अंतरावर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आहे.असे असताना एका चौकातील दुकानाचे कुलूप आरीने कापून चोरी करणाऱ्या चोरांचे धाडस पाहून इतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे.चौकातील दुकाने सुरक्षित नाही तर गल्ली बोळातील दुकानांचे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून येथील cctv camera सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा काढण्यात आल्याची माहिती आहे.पोलिसांची रात्रीची गस्त night petroling वाढविण्याची मागणी नागरिकांनी केले आहे.