प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल : - चंद्रपुर जिल्ह्यातील मूल तालुक्यात चिमढा येथे 3 जानेवारी सावित्रीआई जयंती उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन दर्शन करतांना महाराष्ट्रातील नामवंत प्रबोधनकार, साहित्यिक, कवयित्री, सामाजिक व सत्य शोधक विचारवंत, डाॅ.स्मिता निशिकांत मेहेत्रे मॅडम, मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटक गुरूदास चौधरी, जिल्हा सरचिटणीस अ .भा.माळी महासंघ चंद्रपुर, कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा.प्रा. विजय लोनबले, अध्यक्ष अखिल भा. म. फूले समता परिषद जिल्हा चंद्रपुर, मार्गदर्शक, बळीराम निकोडे, माळी समाज सेवा संघ अध्यक्ष जिल्हा चंद्रपुर, सामाजिक विचार वंत, निशिकांत मेहेत्रे सर नागपूर, चिमढा येथील सरपंच, कालिदास खोबरागडे, मा.ईश्वर लोनबले सर, मा.नंदू बारस्कर सामाजिक कार्यकर्ते, इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.गजानन चौधरी माजी सरपंच चिमढा तर संचालन वैभव लोनबले यांनी केले
या कार्यक्रमाला गावातील गावातील शेकडो महिला पूरूष, विद्यार्थी बाहेर गावातील ज्ञोता गण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमात महीला मोठ्या प्रमाणावर होत्या हे विशेष होते