चंद्रपूर - जिल्ह्यात गत 24 तासात 619 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 739 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी मृत्यू संख्या शून्य आहे. Corona infection
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 244, चंद्रपूर 76, बल्लारपूर 61, भद्रावती 70, ब्रह्मपुरी 23, नागभीड 17, सिंदेवाही 6, मुल 35, सावली 23, पोंभूर्णा 7, गोंडपिपरी 7, राजुरा 20, चिमूर 24, वरोरा 92,कोरपना 27, तर जिवती येथे 7 रुग्ण आढळून आले असून इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. Corona cases today
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 95 हजार 883 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 90 हजार 333 झाली आहे. सध्या 4002 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 38 हजार 971 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 41 हजार 505 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1548 बाधितांचे मृत्यू झाले आहे. Coronavirus update
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.