प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मुल येथील वरिष्ठ महाविद्यालयाचे इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. गणपत आगलावे यांनी नुकतीच पी.एच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल कर्मवीर महाविद्यालयात कर्मवीर परिवारातर्फे प्राचार्य कक्षात डॉ. आगलावे सरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या डॉ. अनिता वाळके, डॉ. गणेश गायकवाड (डेझा), प्रा.सिकंदर लेनगुरे, प्रा.घनश्याम डोंगरावर, प्रा.अनिल शेलेकर, कर्मचारी देविदास मशाखेत्री, भारत रामटेके, यांचेसह वरिष्ठ महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,एम.सी.व्ही.सी. विभागाचे सर्व कर्मचारी, द्विलक्षी अभ्यासक्रमाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व डॉ आगलावे सरांचे चाहते स्नेही सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांनी देखील शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
