प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल :- राईस मीलच्या प्रदुषणामुळे वार्डातील नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे.त्याचा विपरीत परिणाम लहानांपासून वृदधांपर्यंत सर्वांना होत आहे.त्यामुळे लोकवस्तीतील या दोन राईस मीलला हटविण्यात यावे अशी मागणी वार्डातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. मागील ब-याच वर्षांपासूनच्या लढयाला स्थानिकांना अपयश येत आहे. लोकप्रतिनिधी सुदधा साधा ‘ब्र‘ काढीत नाही. एकीकडे नगर परिषद स्वच्छतेत पुरस्कार पटकावित असताना दुसरीकडे वार्डवासियांना प्रदुषणाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे असल्याचे बोलल्या जात आहे.त्यामुळे स्थानिकांनी आगामी नगर परिषदेच्या होणा-या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा विचार करीत आहेत. Rice mill Pollution
मूल येथील वार्ड क्रमांक 11 मध्ये भारत राईस मील आणि दत्त राईस मील कार्यान्वित आहे.दोन्ही राईस मील शहराच्या मध्यभागी आहेत.नियमित चोविस तास कार्यान्वित असतात. राईस मीलचा आवाज ,त्यापासून निघणारा कांडा,कांद हवेवाटे उडून जवळच्या नागरिकांच्या घरावर पडतो.पावसाळयात कांडा आणि कांद सडल्या नंतर दुर्गंधी सुटते.राईस मीलच्या प्रदुषणामुळे स्थानिक रहिवाश्यांना दमा, खोकला, श्वसनाचे आजारांना सामोरे जावे लागते. स्थानिक रहिवाश्यांनी वारंवार प्रशासनाला आणि लोकप्रतिनीधींना याबाबत अवगत करूनही जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. प्रशासन नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून लोकवस्तीतील राईस मीलला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्वच्छता सर्व्हेक्षणात मूल नगर पालिकेने अनेक पुरस्कार प्राप्त केले.परंतु, भरवस्तीतील राईस मील मुळे स्वच्छतेचे तीनतेरा वाजत आहेत. घाणीच्या साम्राज्यामुळे येथे डुकरांचा सुळसुळाट असतो. त्याचे काय?असा प्रश्न वार्डातील नागरिकांनी केला आहे. जनतेच्या आरोग्याचा विचार करून दोन्ही राईस मील औद्योगिक वसाहत क्षेत्रात हटविण्यात यावे अशी मागणी मुन्ना घुटके,रमेश रणदिवे,राजेश गुलाणी , सुनिल एनतुलवार,संदिप मोहूर्ले,सुरेश गेडाम,मुर्लीधर लाकडे,खेमचंद निमगडे, माधव बाटवे यांच्या सह वार्डवासीयांनी केली आहे.
वार्डातील दोन्ही राईस मील मुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.जेवणाच्या ताटवर सुदधा राईस मीलची धुळ बसते आहे.त्यामुळे आमचे अन्न सुदधा राईस मील मुळे सुरूक्षित नाही.राईस मीलच्या संदर्भात वार्डातील नागरिकांचा हा ब-याच वर्षांपासूनचा लढा आहे. मागील दोन वर्षापासून पुन्हा जीकरीने आवाज उठवित आहोत. प्रशासन कुठे ढेप खात आहे.माहित नाही.परंतु आम्ही आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे आंदोलनास आडकाठी येत आहे.आगामी नगर परिषद निवडणुकीवर सुदधा बहिष्कार घालणार आहोत. रमेश रणदिवे, स्थानिक नागरिक
प्रश्न का सुटत नाहीत :- नगर परिषद क्षेत्रातील समस्या सोडविणे हे नगर परिषद प्रशासनाचे कर्तव्य आहे. राईस मील मुळे प्रदुषणा सारखा गंभीर प्रकार नागरिकांच्या माथी मारल्या जात आहे.जेवणाच्या ताटापर्यत राईस मीलची धुळे बसत असताना प्रशासन कुठे चुकते आहे.असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला आहे. भरवस्तीतील भंगार व्यावसाकाच्या विरोधातील लढा यशस्वी झाल्यांनतर स्थानिक नागरिक आता राईस मील मुळे होणा-या प्रदुषणाच्या विरोधात एकवटले आहे.
