गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
राष्ट्रीय मतदार दिवस हा भारतीय मतदारासाठी तसेच नागरिकासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे.या दिवशी भारतातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशात होणाऱ्या निवडणुकीत सहभागी होऊन आपली जबाबदारी व कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावी हा उद्देश समोर ठेऊन गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. National Voters day
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासाठी मतदारांच्या प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. "आपल्या देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वच मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक असून त्यामुळे खरे प्रतिनिधित्व देशापुढे येईल मतदारांचे केवळ एक मत प्रतिनिधित्व बदलू शकते म्हणून भारतातील प्रत्येक मतदाराने Election मतदान प्रक्रियेत सहभाग घेणे गरजेचे तसेच ग्रामीण भागात मतदानाविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी सुशिक्षित लोकांनी व शिक्षकांनी जाणीवपूर्वक करावी असे विचार विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी मांडले". सदर कार्यक्रमाला शिक्षक,उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.