चंद्रपूर - नववर्षाची सुरवात आमदार किशोर जोरगेवार यांनी Cstps सिएसटीपीएस येथील वीज कामगारांसोबत केली. यासाठी आ. जोरगेवार यांनी आज शनिवारी सकाळी सिएसटीपीएस येथे प्रत्येक्ष जावून कामगारांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या परिश्रमाचे कौतूक करत त्यांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा शहर संघटक कलाकार मल्लारप, यंग चांदा ब्रिगेडच्या वीज कामगार संघटनेचे अध्यक्ष हेरमन जोसेफ, यंग चांदा ब्रिगेडच्या वीज कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश पडाल, शहर संघटक पंकज गुप्ता, युवा नेते अमोल शेंडे, जितेश कुळमेथे, राशेद हुसेन, विलास वनकर, विश्वजित शाहा, बबलू मेश्राम, नितीन शाहा, मंगेश अहिरकर, गौरव जोरगेवार, शकिल शेख आदिंची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांनी नव वर्षाची सुरवात कामगारांसोबत केली. सिएसटीपीएस येथील कामगार महाराष्ट्र प्रकाशमय ठेवण्याचे काम करत आहे. येथील कामागरांच्या श्रमावरच सर्वाधीक विद्युत निर्माता करणारा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्हाची ओळख निर्माण झाली असून ती कायम राहिली आहे. अशा कामगारांसोबत नव वर्षाची सुरवात करतांना आनंद होत असल्याचे यावेळी ते म्हणाले, नव वर्षाचा पहिला दिवस हा कामगारासोबत साजरा करत असतांना येथील कामगारांच्या अडचणींचीही जाण असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले, औष्णिक विद्युत निर्मीती प्रकल्पात काम करत असतांना कामगारांना येणा-या अडचणी बाबतही त्यांनी या प्रसंगी माहिती जाणून घेतली. येथे काम करणा-या कामगार वर्गाला सन्मानजनक वागणूक दिल्या गेली पाहिजे, पूर्ण सुरक्षा साधने उपलब्ध करुन दिल्या गेली पाहिजे अशा सुचनाही यावेळी उपस्थित अधिका-र्यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. New year celebration
चंद्रपूर हा औद्योगीक जिल्हा आहे. पाच हजार मेगॅव्हाटपेक्षा अधिक विज निर्मीती येथे होते. महत्वाचे म्हणजे हे सर्व औष्णीक विज केंद्र असल्याने कोळसा जाळून ही विज उत्पन्न केल्या जाते. त्यामूळे हे जोखमीचे काम आहे. अशातही येथील कामगार वर्ग प्रामाणिकपणे उत्तम काम करत महाराष्ट्राच्या गरजेपेक्षा 30 टक्के विज निर्मीती करण्यात आपले महत्वाचे योगदान देत असल्याचेही ते यावेळी म्हणाले,
यावेळी येथे महिला कामगारांचीही उपस्थिती होती. त्यांना शाल श्रीफळ व भेट वस्तू देत आ. किशोर जोरगेवार यांनी नवं वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. तसेच नवं वर्ष हे सर्व कामगारांसाठी सुख समृधीचे जावे अशा शुभेच्छाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व वीज कामगारांना दिल्यात. नव वर्ष साजरे करण्यासाठी स्वता आमदार कामगारांमध्ये अल्याने कामगारांनीही त्यांचे आभार मानत आपल्या समस्या ठेवल्यात. या सर्व समस्या सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले. Mla kishor jorgewar
नागरिक हे वेगवेळ्या पद्धतीने नव वर्ष साजरा करत असतात मात्र आ. किशोर जोरगेवार मागील अनेक वर्षांपासून नववर्षाची सुरवात अभिनव पद्धतीने करत असून देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगार वर्गासोबत वेळ घालवून ते हा दिवस साजरा करतात. या पूर्वी त्यांनी वेकोलिच्या भूमिगत खदानीत जाऊन अतिशय कठीण परिस्थितीत काम करत असलेल्या वेकोलिच्या कर्मचाऱ्यांसोबत नववर्षाचा पहिला दिवस साजरा केला होता हे विशेष.