प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायतच्या निवडणुकीच्या पूर्वी कांग्रेसचे काही कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश करून घेतल्याने ऐन निवडणुकीत भाजपमध्ये उत्साह संचारला होता. तरीदेखील सावली नगर पंचायत निवडणुकीत एवढे करूनही कांग्रेस निकालात बाजी मारणार असल्याची चर्चा केली जात आहे. परंतु पोंभुरण्यातील भाजपाचे निष्ठावान प्रसिद्धी प्रमुख दिलीप म्याकलवार व नगर पंचायत समितीच्या माजी सभापती तथा भाजपच्या जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ.सुनीता दिलीप म्याकलवार ह्या विद्यमान नगर पंचायतीच्या सिटिंग मेम्बर होत्या. Entering the Congress party परंतु सक्षम नेतृत्व अभावी समोर होऊ घातलेल्या काही वार्डातील निवडणुकींच्या ऐन वेळेवर त्यांनीही कांग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपा हादरली आहे. यामध्ये पोंभुर्णा तालुका महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा सौ.आशा विजय गुडेपवार यांनीही भाजपच्या झेंड्याला बाजूला करुन भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचा दुपट्टा महाराष्ट्र राज्याचे ओबीसी कल्याण व मदत पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार, जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, कांग्रेस नेते आणि मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, मुल नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष व संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, तालुका अध्यक्ष कवडुजी कुंदावार, आतीक कुरेशी, ओमेश्वर पदमगिरवार, जयपाल गेडाम, प्रीतिष कुंदावार, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणाऱ्याणच्या गळयात टाकल्याने पोंभुरण्यात भाजपला चांगलीच खिंडार पडली आहे. अधिकृत भाजपचे पदाधिकारी कांग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याने भाजपामध्ये अस्वस्थता पसरली असून जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांनी सावलितील वचपा पोंभुरण्यात काढल्याची चर्चा केली जात आहे.
