प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ऐन शेतीच्या हंगामात मुल तालुक्यातील बेंबाळं येथील शेतकरी श्री.सुरेश नामदेव निलमवार यांच्या जनावरांना वाघाने हल्ला करुन मारल्याने बिचाऱ्या गरीब शेतकरी हवालदिल होते. प्रसंगी शेतकऱ्यांवर दुसऱ्याचे जनावर आणून शेती कसण्याची पाळी येते याचाही विचार बँकेने केला असून शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या जनावरांचीही काळजी घेणे हेही बँकेचे कर्तव्य समजून CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना बेंबाळं येथील कांग्रेसचे निष्ठावान जेष्ठ कार्यकर्ते दीपक पाटील वाढई यांनी लक्षात आणून दिल्याने हवालदिल शेतकरी श्री. सुरेश नामदेव नीलमवार यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन (१००००/-) दहा हजार रुपये बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून मदत देण्यात आले. याप्रसंगी मदतीचा चेक देतांना कांग्रेसचे नेते दीपक पाटील वाढई, मुल तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व नगर परिषद माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार, सामाजिक कार्यकर्ते गुरु गुरनुले, बेंबाळं येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लवसन वाढई, सामाजिक कार्यकर्ते पराग वाढई, बौध्द समाज अध्यक्ष विकास वाळके, विस्तार चिलरवार, अझीम खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते. गरीब व निराधार शेतकऱ्यांना CDCC बँकेने आधार दिल्याने दाबगाव येथील ग्रामस्थांनी अध्यक्ष संतोषसिंह रावत व बँकेचे संचालक मंडळ यांचे आभार मानले आहे.