गडचांदूर :- कोविड19 विषाणुच्या प्रादुर्भावात मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे.याविषयी शासनप्रशासन गंभीर असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे. Covid 19 नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाईचे आदेश असल्याने ठिकठिकाणी याची मोठ्याप्रमाणात अंमलबजावणी सुरू झाली आहे. No mask no entry याच पार्श्वभूमीवर गडचांदूर येथे पोलीस स्टेशन,महसुल विभाग व नगरपरिषदेच्या पथकाकडून मागील तीन दिवसांपासून शहरात बिनधास्त विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 15 जानेवारी रोजी येथील संविधान चौक व बसस्थानक परिसरातील काही दुकानदार व लहानमोठे वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.तसेच मास्क नसलेल्यांना ठाणेदार सत्यजित आमले यांनी मास्कचे वाटप करत कोविड संबंधी शासनप्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, coronavac कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन संबंधित नागरिकांना केले.सदर कारवाईत येथील पटवारी, नगरपरिषद व पोलीस कर्मचार्यांची उपस्थिती होती.