चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात कोल माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला असून दर्जेदार कोळसा खाणीतून उचलायचा व तो खुल्या बाजारात विक्री करायचा व निकृष्ठ कोळसा वीज कंपन्यांना द्यायचा हा गोरखधंदा मागील काही वर्षांपासून सर्रासपणे सुरू आहे.
असाच एक प्रकार 18 जानेवारीला नांदगाव येथे घडला, पृथ्वी जंगम नामक व्यक्तीचा स्टीम कोळशाच्या डिओ होता, 18 जानेवारी हा डिओ परमिट चा शेवटचा डिओ होता मात्र तो स्टीम कोळसा रामदेवबाबा ट्रान्सपोर्ट कंपनीने ट्रक मध्ये भरला व बाहेर काढू लागला मात्र त्यावेळी काही नागरिकांनी ते ट्रक पकडले. Coal scam in chandrapur
कारण रामदेवबाबा ट्रान्सपोर्ट कंपनीकडे स्लॅग कोळशाचा डिओ असल्याने त्यांनी स्टीम कोळसा ट्रक मध्ये भरलाच कसा? हा सरळ कोल स्कॅम आहे असा थेट आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी लावत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय कोळसामंत्री जोशी व मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. Shree ramdev baba transport
या प्रकरणाने आता पुन्हा तिवारी-पुगलिया आमनेसामने आले आहे.
श्री रामदेवबाबा ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक धर्मेंद्र तिवारी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत माजी खासदार पुगलीया यांनी तिवारी कुटुंबांची बदनामी केली असून त्यांच्यावर मानहानी चा दावा करणार अशी भूमिका पत्रकार परिषदेत घेतली.defamation suit
तिवारी यांनी यावेळी सांगितले की मागील 50 वर्षांपासून आम्ही कोळश्याचा व्यवसाय करीत आहो यामध्ये अजूनही कोणतेही आरोप झाले नाही.
ज्यावेळी ते ट्रक पकडले तर वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही? कारण तो कोळसा वैध मार्गाने नेण्यात आला. Wcl chandrapur
माजी खासदार पुगलिया यांनी तिवारी कुटुंब व श्री रामदेवबाबा ट्रान्सपोर्ट कंपनीची बदनामी केली आता पुगलिया यांच्याविरोधात कोर्टात मानहाणीचा दावा ठोकणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
तिवारी-पुगलिया यांचा आधी राजकीय वाद व आता कोळसा प्रकरणात पुन्हा वादाचा सामना कोण जिंकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.