सिंदेवाही - सिंदेवाही-लोणवाही नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली.दिनांक १९ जानेवारी २०२२ ला निवडणूक आयोग अधिकारी यांनी निवडणूकिचा निकाल घोषित केला. मात्र निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर लोणवाही-सिंदेवाही नगरपंचायत निवडणूकितील प्रभाग क्र.१५ चे उमेदवार मिथुन भाऊजी मेश्राम,रितेश नीलकंठ राचलवार,अशोक हनुमंत बोम्मावार,सुनील सूर्यभान आईटवार यांनी निवडणूक मतदान मशीनवर evm शंका निर्माण केली आहे. असे विनंती अर्जाद्वारे कळाले आहे.विनंती अर्ज त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्याकडे विनंती अर्ज सादर केला आहे.त्यामध्ये १)२१ डिसेंबर २०२१ ते आजतागायत पर्यंतचे सीलबंद मतदान यंत्रे ठेवलेल्या cctv सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले आहे.२)प्रभाग क्र.१५ मध्ये मतदानासाठी वापरण्यात आलेले मतदान यंत्रे Control unit and ballet unit (कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट) यांच्यात झालेल्या मतदानाचा मार्क पोल म्हणजे अभिजात मतदान आमच्यासमोर करून दाखविण्याची कृपा करावी.३)बॅलेट युनिटमध्ये निवडणूक उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी मिळालेले चिन्ह यांच्या आकृतीची साईज याबाबतचे नियम व तपशील मिळण्यात यावे.अश्या प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे अर्जात असेही नमूद आहे कि ही माहिती देण्यासाठी शासकीय नियमानुसार जे दर ठरविलेले असणार ती रक्कम आम्ही भरायला तयार आहोत. तेव्हा ह्या सर्व उमेदवारांच्या विनंती अर्जाने लोणवाही-सिंदेवाही नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र.१५ मधील मतदारांमध्ये निरनिराळ्या चर्चेला उधाण येत आहे. अर्जदाराच्या मनातील शंकेच निराकरण निवडणूक निर्णय अधिकारी हे कोणत्याप्रकारे करतात ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.