चंद्रपूर - भारतीय गणराज्याचा ७३वा प्रजासत्ताक दिन महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात उत्साहाने साजरा करण्यात आला. Msedcl republic day
चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहन झालेव सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी ध्वजास मानवंदना अर्पण केली. प्रजासत्ताक दिन साजरा करीत मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनांच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अधिक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे (चंद्रपूर प्रविभाग), सुहास म्हेत्रे, अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा), चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता उदय फरासखानेवाला व कर्मचारी बंधू मोठया संख्येने उपस्थित होते.
