प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - महाराष्ट्र शासनानी महाविद्यालयीन १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करुन घेण्याचे आदेश निर्गमित केल्याने शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मुल येथे आद्य पत्रकार balshastri jambhekar आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिनाच्या दिवशी कर्मवीर महाविद्यालय मुल येथील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना ( NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ अंतर्गत कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. Covid 19 vaccinationमुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील वैद्यकीय टीम मधील डाँक्टर, नर्स,कर्मचारीही यांच्या टीमने उपस्थित विद्यार्थ्यांचे लसीकरण करुन घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या नेतृत्वात हा उपक्रम घेण्यात आला असून उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ. गणेश गायकवाड, प्रा.डॉ. के.एच.कऱ्हाडे, प्रा.गजानन घुमडे,प्रा.गणपत आगलावे, प्रा. प्रवीण उपरे, प्रा.डॉ. संदीप मांडवगडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर,प्रा. आय.एल.पडोळे, प्रा.डी.एन.चुदरी, प्रा. निखिल दहीवले, प्रा. देवानंद मासिरकर, प्रा.जि.आर. डोंगरवार, प्रा. सागर मासिरकर, प्रा. सिकंदर लेनगुरे, प्रा.एन.सी.चन्ने, प्रा.सागर बोधे, प्रा.शेलेकर यांनी अथक परिश्रम घेतले. या कृतिशील उपक्रमात वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. लसीकरण करुन घेण्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील टीमने सहकार्य दिल्याबद्दल महाविद्यालयाने वैद्यकीय अधिकारी व संपूर्ण टीमचे आभार मानले.