चंद्रपूर - महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी आयोजित लसीकरण बंपर लकी ड्रॉचा पुरस्कार वितरण सोहळा शुभारंभ बुधवार दिनांक २६ जानेवारी रोजी महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाग्यश्री गजभिये यांना फ्रिज, विनोद लाडे यांना वॉशिंग मशीन देऊन सन्मानित करण्यात आले. Vaccination bumper draw
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात आयोजित लसीकरण लकी ड्रॉ बक्षीस वितरण कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांची उपस्थिती होती.
Covid vaccination
कोविड लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी दि. १२ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान बंपर लकी ड्रॉ उपक्रम घेण्यात आला. या योजनेस मोठा प्रतिसाद मिळाला. ता. २४ डिसेंबर रोजी सोडत काढण्यात आली. यात विजेत्या ठरलेल्या भाग्यवंतांना २६ जानेवारी रोजी बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
यात प्रथम बक्षीस भाग्यश्री गजभिये यांना फ्रिज, दुसरे बक्षीस विनोद लाडे यांना वॉशिंग मशीन, तिसरे बक्षीस रामप्रसाद बिस्वास यांना एलईडी टीव्ही, तर प्रोत्साहनपर बक्षिस विजेते रणजित कुळसंगे, सुनीता शेंडे, उमा मोहुर्ले, तिरुपती झाडे, अरविंद मानकर, कल्पना तारगे, ताराबाबू सिडाम, राम मोघे, हरीश्चन्द्र दोगडे, चेदीलाल गुप्ता यांना १० मिक्सर ग्राइंडर देऊन सन्मानित करण्यात आले.
