प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल : तालुक्यातील बोरचांदली येथे जनसुविधा योजना 2020 - 21 अंतर्गत किसान भवन परिसराचे सौंदर्यीकरणाचे अंदाजित किंमत अडीच लक्ष रुपयाच्या कामाचे भूमिपूजन जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी बोरचांदली येथे गावाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक शाळा खोली बांधकाम (अंदाजित खर्च 14 लक्ष रु.), अंगणवाडी बांधकामाकरिता (अंदाजित किंमत 10 लक्ष रु.) मंजूर झालेले आहेत. शाळा खोली व अंगणवाडीचे काम लवकरच सुरु करण्यात येईल व 06 लक्ष रु. अतिरिक्त निधी देण्याचे नियोजित असल्याचे सांगितले. तसेच गावाच्या विकासाकरिता गावाकऱ्यांनी एकत्र यावे व गावाच्या विकासासाठी आवश्यक कामांचा पाठपुरावा करावा, असा मनोदय व्यक्त केला.
याप्रसंगी ललिता सेमस्कर (सरपंच), हरिभाऊ येणगन्टीवार (उपसरपंच), बाबुराव येणगन्टीवार (सामाजिक कार्यकर्ते), बंडूभाऊ नर्मलवार (सरपंच, उश्राळा), अभिषेक पोरेड्डीवार (भाजपा, अध्यक्ष), ग्रामपंचायत पदाधिकारी तथा ग्रामपंचायत सदस्यगण व बोरचांदली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
