प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - भारतीय जनता पार्टी बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर च्या वतीने दि.१७/१/२०२२ रोजी सोमवारला बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व साकोली येथील आमदार नाना पटोले यांच्याविरुद्ध त्यांनी देशाचे narendra modi पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या प्रती केलेल्या आक्षेपार्ह विधान बद्दल त्यांच्याविरुद्ध योग्य कार्यवाही करण्याकरिता तक्रार नोंदवून घेतली. या आक्षेपार्ह विधानामुळे देशभरातील समस्त भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ता व नागरिकांच्या मनात मोठा राग निर्माण झाला असून याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर बल्लारपूर शहरात नाहीतर संपूर्ण जिल्ह्यात, संपूर्ण प्रदेशात तसेच संपूर्ण देशात याचा तीव्र निषेध करण्यात येईल तरी पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर नाना पटोले यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली.
Offensive statement nana patole
यावेळी चंदनसिंह चंदेल,माजी अध्यक्ष, वन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात हरीश शर्मा, माजी नगराध्यक्ष नगरपरिषद बल्लारपूर यांच्या नेतृत्वात व काशिनाथ सिंह भाजपा शहराध्यक्ष बल्लारपूर यांच्या अध्यक्षतेत भाजपच्या शिष्टमंडळाने बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. याप्रसंगी शहर महामंत्री मनीष पांडे,भाजयुमो अध्यक्ष ऍड. रनंजय सिंह, भाजपा शहर सचिव इंजी. देवेंद्र वाटकर, भाजयुमो शहर मंत्री घनश्याम बुरडकर, भाजपा युवा नेता किशोर मोहुरले, बीरेंद्र श्रीवास, सुरेन्द्रसिंह खडका शिष्टमंडळात उपस्थित होते.
