गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर जवळील अंबुजा फाटा येथे गेल्या 10 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास केटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या एका बल्कर वाहनाने जिवती तालुक्यातील हिमायतनगर येथील उमेश बळीराम जाधव वयवर्ष अंदाजे 34 याचा अपघात झाला होता.सध्या त्याचा चंद्रपूर येथे उपचार सुरू असून सदर अपघातग्रस्त व्यक्तीची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. केटीसी ट्रान्सपोर्ट ktc transport कंपनीकडून उपचाराचा खर्च देण्याची हमी देण्यात आली होती.मात्र सध्याच्या परिस्थितीत उपचाराचा खर्च जास्त येत असल्याने सदर ट्रान्सपोर्ट कंपनी उपचाराचा खर्च देण्यास टाळाटाळ करीत होती. अपघातग्रस्त व्यक्तीची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असल्याने लवकरात लवकर उपचार व्हावा यासाठी अनैशा वाहन चालक व इतर कामगार संघटनेच्या वतीने 17 जानेवारी रोजी अंबुजा फाटा येथे केटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीचे कामबंद आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला यश प्राप्त झाले असून उपचाराचा अर्धा खर्च देण्याची तयारी केटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीने दाखवली आहे. Justice
आंदोलना दरम्यान जोरदार नारेबाजी करत अंबुजा सिमेंट कंपनीत जाणाऱ्या केटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वाहनांना आंदोलनकर्त्यांनी अडविल्याने याठिकाणी तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती.दरम्यान अनेक प्रकारच्या घडामोडीनंतर अखेर केटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीने सदर अपघातग्रस्त व्यक्तीच्या उपचारासाठी लागणार्या खर्चा पैकी अर्धा खर्च देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.भिम आर्मी राजूरा तालुका उपप्रमुख तथा अनैशा वाहन चालक व इतर कामगार संघटना संयोजक व अध्यक्ष सुरज उपरे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले असून अनील चिलमूले,मिथून कांबळे,भिमराव आंबटवार,पुरूषोत्तम उपरे,नामदेव जाधव, गणेश आमणे,सत्यपाल गौरकार,अमरजीत सिंग,संदीप चंद्रगिरवार,अकील शेख,विट्ठल जेऊरकर, गोविंदा वाघमारे,बाबा ननावरे सह इतरांनी आंदोलनात सहभाग घेतला.
