प्रतिनिधी/रमेश निषाद
विसापूर : चंद्रपूर - बल्लारपूर, (विसापूर टोल toll naka ) महामार्गावर शुक्रवार सकाळी पहाटेला एका अज्ञात वाहनाच्या धडकेत माकडाचा अपघाती मृत्यू झाला.
हा महामार्ग दुपदरी असल्यामुळे सुसाट वेगाने वाहने धावत असतात. बाजूलाच लागून जंगल व मानवी वस्ती, शाळा असल्याने अनेक बंदराची टोळी अन्नपदार्थांच्या शोधात इकडे येत असतात आणि अपघाताला बळी पडत असतात. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी ये- जा करणे ही नित्याची बाब झाली आहे अलिकडेच काही दिवसापूर्वी मध पोळ्याच्या शोधात अस्वल टोल नाक्याजवळ आली होती. या परिसरात वाघ,बिबट, रानडुक्करांचा वावर आहे. त्यामुळे या परिसरात लोखंडी जाळीचे कुंपण किती आवश्यक आहे ही बाब वन विभागाच्या लक्षात आली. परंतु वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. दिवसेंदिवस जंगली श्वापद व मानवामध्ये संघर्ष वाढलेला आहे. त्यामुळे या परिसरात जाळीचे कुंपण करण्यात यावी अशी मागणी आणखी जोर धरू लागली आहे.