चंद्रपूर - मकरसंक्रांती निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम करीत युवासेना युवती चंद्रपूर पदाधिकाऱ्यांनी भाजीपाला विक्रेत्या महिलांसोबत हळदीकुंकू कार्यक्रम साजरा करीत त्यांना वाण म्हणून mask for woman मास्कचे वाटप करण्यात आले. Yuvasena chandrapur
चंद्रपूर विधानसभा युवासेना युवती, युवासेना प्रमुख मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कार्यकारीणी व सिनेट सदस्य सौ.शितलताई देवरुखकर शेठ यांच्या संकल्पनेतुन युवासेना युवती चंद्रपूर जिल्हा विस्तारक सौ.तृष्णाताई गुजर, चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे व चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.निलेशदादा बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाने व युवासेना शहर समन्वयक करन वैरागडे यांच्या सहकार्याने, चंद्रपूर विधानसभा येथे हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम
भाजी बाजारातील महीला समवेत साजरा केला. यावेळी भाजीपाला विक्री करणाऱ्या युवतींना, महिलांना Mask distribution वान म्हणून देऊन व त्यांना तिळगुड देऊन सामाजिक विचाराने कोरोना काळात मास्कचे महत्त्व समजवून त्याचा उपयोग करावा व कोरोना ला हद्दपार करण्यात शासनाला सहकार्य करावे हा सामाजिक संदेश युवती सेना मार्फत देण्यात आला. Wear mask stay safe
सदर कार्यक्रमास उपस्थित चंद्रपूर उपजिल्हा अधिकारी सौ रोहिणी विक्रांत पाटील, बल्लारपूर उपजिल्हा अधिकारी विपष्णा मेश्राम, तालुका युवती अधिकारी प्रगती पड़ेलवार, उपतालुका युवती अधिकारी काजल बुटले,शहर चिटणीस धनश्री हेडाऊ,उपशहर युवती अधिकारी सुनिधी इंगोले,शाखा प्रमुख रोशनी गोलदार,उपशाखा प्रमुख संतुष्टी बुटले, शहर चिटनीस आरती समुद्रलवार उपस्थित होते.
