प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - दिनांक 30 जानेवारी रोज रविवार ला
देश गौरव पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम देशात संपूर्ण बुथ स्तरावर राबविण्याचा संकल्प पक्षातर्फे करण्यात आला त्याच अनुषंगाने मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवाकेंद्रात तथा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कार्यालयात बल्लारपूर बूथ क्रमांक 188 मधील सर्व कार्यकर्त्यांनी बसून मन की बात या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. व त्यानंतर वॉर्डातील समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा बूथ क्रमांक 188 चे बूथ प्रमुख आशिष देवतळे भाजयुमो जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, बुथचे वरिष्ठ पदाधिकारी गोपाल रेड्डी तसेच सचिन देवतळे, रवी पिंपळकर, संकेत बारसागडे, सागर नागोसे, नवराज परसुटकर, अनुप कांबळे, आदर्श निर्मल, रवी पद्मगिरवार, सोनू पिंपळकर, सचिन कायरकर, विवेक लाकडे, बबलू माशलकर, गणेश कुंडे, पियुष मेश्राम आधी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला तसेच माइक्रो डोनेशन च्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी जनसेवेसाठी पार्टी फंड जमा केले.
