चंद्रपूर - चंद्रपूर शहरात प्रदुषण निर्माण केल्याप्रकरणी सिएसटिपिएसला 5 कोटिचा दंड ठोठावला असताना वॄक्ष जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन वसाहतीत एका 40 वर्ष जुन्या व 40 फुट उंच जांभळाच्या झाडाला नष्ट करण्याच्या उद्देशाने झाडाला 2 ते 3 फुट खोल छिलण्यात आल्या नंतर झाडाला आग लावून जाळण्यात आले. या प्रकारामुळे झाडाचे अस्तित्व धोक्यात आले असून आठवड्याभरात झाड वाळून नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. झाडाला जाळणार्या विकॄत व्यक्ती विरोधात संजीवनी पर्यावरण व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी वनविभाग तसेच सिएसटिपिएस व्यवस्थापनाकडे तक्रार केली आहे. व झाड तोडणा-यावर खडक कारवाई ची मागणी केली आहे.या तक्रारीची दखल घेत वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जाळलेल्या झाडाचा पंचनामा करून या प्रकरणी दोषी चा शोध घेऊन वन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असे वन अधिकार्यांनी म्हटले आहे.