चंद्रपूर - थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसुत्री मोहिमेतील एक गाव-एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक १ जोनवारी पासून गावोगावी सदर उपक्रम घेण्यात येत आहे. चंद्रपूर परिमंडल कार्यक्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत चंद्रपूर मंडळातील २ हजार ३९३ व गडचिरोली मंडळातील २ हजार ५२ विविध अशा ४ हजार ४४५ एकून तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. या अगोदर मागील वर्षी ही सदर मोहीम चंद्रपूर मंडळात राबविण्यात आली होती.
Msedcl chandrapur
ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्याासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी चंद्रपूर मंडळातील १२ तालुक्यातील व गडचिरेाली मंडळातील १५ काही गावात एक गाव - एक दिवस हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या मोहिमेत गावकर्यांशी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी थेट संवाद साधून मोबाईल अँप, वीजसुरक्षा व ग्राहक सेवेबाबतच प्रबोधन करण्यात येत आहे. महावितरणकडून करण्यात येणाऱ्या कामामध्ये तारांमधील झोल काढणे, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या, झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, गांजलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्वि्हस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत.
मंडळनिहाय करण्यात आलेली कामे
गडचिरोली मंडळ
नविन वीज जोडणी देणे ६३, वीज देयक दुरूस्ती ७०, वीज देयक वसुली ९.३०, नादुरूस्त् मीटर बदलणे ९३, नादुरूस्त् सर्व्हिस वायर बदलणे १३१, मीटरची जागा बदलणे १८, कायम खंडीत ग्राहकांची पुर्ण तपासणी ११४, ० युनिट वापर असलेल्या ग्राहकांची तपासणी १०१, ० ते ३० युनिट वापर असलेल्या ग्राहकांची तपासणी २५२, वीज वाहिनींची पाहणी करणे व झाडांच्या फांदया छाटणे १९०, वितरण रोहित्र अर्थिंग करणे १२, वितरण रोहित्रात तेल भरणे २, जळालेल्या वितरण रोहित्र बदलणे ६, वितरण पेटी दुरूस्त् करणे २३, जिर्ण झालेले खांब बदलणे ७, वाकलेले उच्च्दाब / लघुदाब पोल सरळ करणे ५०, लोबकळणाऱ्या उच्च्दाब / लघुदाब तारा खेचणे १३२, उच्च्दाब / लघुदाब सपोर्ट अर्थिंक करणे १३, उच्च्दाब / लघुदाब वाहिनीला सुरक्षा जाळे लावणे २४, लघुदाब वाहिनीवर पी.पी.सी. स्पेसर्स लावणे ५८, एबी स्विच / आयसोलेटर देखभाल दुरूस्ती करणे १६, पीन इन्सुलेटर बदलणे २२, डिस्क् इन्सुलेटर बदलणे ४, स्टे इन्सुलेटर बदलणे ०, मीटर रिडींगची पडताळणी १६३, मंजुर भार व प्रत्यक्ष भार तपासणी ६४, देयकात नाव / पत्ता बदलणे किंवा दुरूस्ती १९, थकबाकीदारास नोटीस देणे १४, जास्त् थकबाकी असणाऱ्या ग्राहकांची भेट घेऊन देयक भरणा करण्याबाबत समजावून सांगणे २८२, ग्राहकांचे मोबाईल नंबर नोंदणीकृत करणे १०५, थकबाकीदार ग्राहकास नोटीस देणे ८ हजार असे सर्व मिळून एकंदरीत २ हजार ५२ कामे करण्यात आली आहेत.
चंद्रपूर मंडळ
नविन वीज जोडणी देणे ३, विज देयक दुरूस्ती ९, वीज देयक वसुली २.१६, नादुरुस्त् मिटर बदलणे १२, नादुरूस्त् सर्व्हिस वायर बदलणे ६०, मीटरची जागा बदलणे ४, कायम खंडीत ग्राहकांची पुर्न:तपासणी २१, ० युनिट वापर असलेल्या ग्राहकांची तपासणी ९, ० ते ३० युनिट वापर असलेल्या ग्राहकांची तपासणी ४२ वीज वाहिनीची पाहणी करणे व झाडांच्या फांदया छाटणे ४७, वितरण रोहित्र अर्थिंग करणे २, वितरण पेटी दुरूस्ती करणे ५, जिर्ण झालेले खांब बदलणे १, वाकलेले उच्च्दाब / लघुदाब पोल सरळ करणे १०, लोंबकळणाऱ्या उच्च्दाब / लघुदाब तारा खेचणे ४४, उच्च्दाब / लघुदाब सपोर्ट अर्थिंग करणे ३, लघुदाब वाहिनीवर पी.पी.सी. स्पेसर्स लावणे ८, एबी स्विच / आयसोलेटर देखभाल दुरूस्ती करणे ३, पिन इन्सुलेटर बदलणे ३, डिस्क् इन्सुलेटर बदलणे ०, स्टे इन्सुलेटर लावणे ०, मिटर रिडींगची पडताळणी २०, थकबाकीदार ग्राहकास नोटीस देणे ०, जास्त थकबाकी असणाऱ्या ग्राहकांची भेट घेऊन देयक भरणा करण्याबाबत समजावून सांगणे ५५, ग्राहकांचे mobile मोबाईल नंबर नोंदणीकृत करणे ६, नविन जोडणी दिलेल्या ग्राहकास देयक सुरू झाले कि नाही हे तपासणी १० असे सर्व मिळून एकंदरीत २ हजार३९३ कामे करण्यात आली आहेत.
एक गाव एक दिवस या उपक्रमाची पूर्वमाहिती दिल्यानंतर संबंधीत गावात महावितरणचे अभियंता व जनमित्र तसेच बिलिंग स्टॉफ एकाच दिवशी ग्राहकसेवेचे काम करीत आहेत. वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीचे कामे तसेच इतर ग्राहकसेवा गावातच उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थ आनंदाने महावितरणला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मुख्य अभियंता सुनिल देशपांडे,चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंत्या श्रीमती संध्या चिवंडे, चंद्रपूर,वरोरा, बल्लारषा गडचिरेाली, आलापल्ली व ब्रम्हपूरी विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता हे विशेष परिश्रम घेत आहेत. करोनाबददल सतर्कता राखून तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात येत हि मोहिम राबविण्यात येत आहे.चंद्रपूर परिमंडळात सर्वत्र राबविल्या जाणार असून वीज ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.