गडचांदूर:- राजूरा विधानसभा क्षेत्रातील हेमाडपंती पुरातत्त्व पर्यटन स्थळ सोमेश्वर मंदिर,सिध्देश्वर मंदिर, माणिकगड किल्ला येथे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासंदर्भात आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे २५ कोटी रूपये निधीची मागणी केली आहे.यात माणिकगड किल्ल्यासाठी १० कोटी, सिध्देश्वर मंदिरासाठी १० कोटी,सोमेश्वर मंदिरासाठी ५ कोटी रुपये निधीची मागणी आहे. त्यानुसार tourism पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या निर्देशानुसार वरील सर्व ठिकाणी नागपूर विभागाचे Department of Archeology पुरातत्वशास्त्रज्ञ विभागाचे उपसंचालीका जया वाहणे यांनी आपल्या विभागातील अभियंता यांना घेऊन येथे भेट दिली.परिसराचा सविस्तर आढावा घेतला.संभाव्य अंदाजपत्रकानुसार येथे आवश्यक विकासकामांचा आराखडा तयार करून त्या संबंधित विभागाला माहिती देणार आहेत.त्यानंतर लवकरच येथे विकासकामांना सुरूवात होणार आहे.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, विठ्ठल थिपे,मारोती येरणे, प्रभाकर येरणे,श्याम बोलम,अब्दुल अहमीद, राजेशाम कुरमावार,शंकर बोंकुर,श्रीकांत बेतावार, अब्दुल जावेद,प्रा.आशिष देरकर,नगराध्यक्षा सविता टेकाम,गटनेते विक्रम येरणे,राहूल उमरे, सिताराम कोडापे आदींची उपस्थिती होती.