चंद्रपूर - शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरातील शाळा आणि अंगणवाडीतील १ ते १५ वर्षांपर्यंतच्या ३ जानेवारीपासून जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. ही लसीकरण मोहीम शहरातील १६८ शासकीय आणि खासगी शाळा आणि १८५ अंगणवाडीमध्ये राबविण्यात येणार असून, एकूण ७६ हजार २५ मुलांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांनी दिली.
japanese encephalitis
जपानीज एन्सेफलिटीस आजाराचा मृत्यूदर तीस टक्के आसपास आहे. आजारामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यात जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने व्यापक तयारी केली आहे.
Chandrapur municipal corporation
चंद्रपूर शहरात एकूण ३ लाख ५६ हजार ७५ लोकसंख्येपैकी १ ते १५ वयोगटातील मुलांची संख्या ७६ हजार २५ इतकी आहे. यासाठी १६८ शासकीय आणि खासगी शाळा आणि १८५ अंगणवाडीमध्ये केंद्र नियोजित करण्यात आले असून, १२ सुपरवायझरच्या नेतृत्वात ४६० चमू कार्यरत राहणार आहेत. ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. Vaccination