घुघुस - घुघुस पासून काही अंतरावर असलेल्या सुप्रसिद्ध पांढरकवडा हनुमान मंदिर जवळ दुचाकीचा अपघात झाल्याने 2 युवक गंभीर जखमी झाले आहे.
दुचाकी क्रमांक MH34J2087 ने दुचाकी चालक धानोरा निवासी 22 वर्षीय विवेक मोहितकर व 19 वर्षीय हर्षल डंबरे हे दोघे परत येत असताना अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. Accident ghughus
या अपघातात विवेक मोहितकर हा युवक गंभीर जखमी तर हर्षल डंबरे हा किरकोळ जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच घुघुस पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही युवकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पुढील तपास घुघुस पोलीस करीत आहे.