प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर:- बल्लारपूर शहरात करोडो रुपयांची लागत लावून रस्ते नाल्या व गल्लीतले रोड बांधण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नळयोजनेमुळे शहरातील संपूर्ण रस्ते, नाल्या व गल्लीतले रोड फोडण्यात आले असून त्यामुळे नगरपरिषदेचे करोडो रुपयाचे नुकसान झाले आहे. नगरपरिषदेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून याविरोधात दिनांक २७ डिसेंबर २०२१ ला सकाळी ११ वाजता बल्लारपूर नगर परिषद समोर वंचित बहुजन आघाडी द्वारा आक्रोश धरना आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. Vanchit Bahujan Aghadi
सदर आक्रोश धरणे आंदोलनामध्ये बल्लारपूर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आंदोलनात सहभागी होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी बल्लारपूर येथील जनतेला केले आहे. pits