घुघुस - दिनांक 18 आणि 19 डिसेम्बर ला पार पडलेल्या विदर्भ स्तरीय कराटे स्पर्धेत चि आर्येश संजय उपाध्ये या 13 वर्षाच्या बालकाने 3 पदक घेत घुग्गुस नगरीचे नाव उंचावले.
दोन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनन्तर झालेल्या या स्पर्धेत घुग्गुस येथील Karate trainer कराटे प्रशिक्षक विनय बोढे यांच्या मार्गदर्शनात माउंट कार्मेल कॉ.सी. से. स्कूल,सिमेंट नगर च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.या स्पर्धेत एकन्दर 700 competitors 700 प्रतिस्पर्धी सम्मिलित झाले होते.
यामध्ये चि आर्येश ने 14 वर्ष वयोगटात काता प्रकारात 1 सुवर्ण, कुमिते मध्ये 1 रजत पदक आणि चेम्पियन ऑफ चेम्पियन्स या मध्ये रजत पदक प्राप्त केले. Karate champion
त्याच्या या यशाने घुग्गुस नगरीच्या माना मध्ये वाढ़ झाली आहे. याआधी झालेल्या अनेक स्पर्धामध्ये आर्येश ने भरपूर पदके जिंकली आहेत.
एप्रिल 2020 मध्ये मलेशिया मधील Maylo Cup मायलो कप टूर्नामेंट साठी देखील याची निवड झाली होती. Karate league
चि आर्येश च्या यशामागे त्याची आई सौ अनुराधा,
वडील श्री संजय उपाध्ये, आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक विनय बोढे आणि सम्पूर्ण कराटे टीम घुग्गुस-चंद्रपूर चे योगदान आहे.