प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - शहराला औद्योगिक पार्श्वभूमी लाभली आहे. शहराच्या सुरवातीलाचं Botanical garden बॉटानिकल गार्डन, सैनिक शाळा, स्टेडियम सारखी मोठी वास्तू आजघडीला निर्माण झाली आहेत. यामुळे या शहराची ओळख आता निव्वळ औद्योगिक नगरी ईतकंच न राहता, ते लवकरच पर्यटनाचं केंद्रबिंदू म्हणून नावालौकिस येत आहेत. मात्र, अलीकडे या परिसरात रस्त्यालगत हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहेत. पाळीव प्राण्यांसह दुचाकी वाहनावर वाघ आणि बिबट्याने हल्ले झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. हि बाब पाहता, परिसरातील नागरिकांसह येणाऱ्या पर्यटकांच्याही सुरक्षितेचा प्रश्न येरणीवर आला आहेत. त्यामुळे चंद्रपूर -बल्लारपूर मुख्य मार्गावरील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन ते बल्लारपूर शहरापर्यंत, बामणी, लावारी, दहेली, केम तूकुम, कळमना, आमडी, कोठारी अश्या गावातील मुख्य रस्त्यालगत काटेरी कुंपण अथवा सौरक्षण भिंत उभारून मानव आणि वन्यप्राणी या दोघांचाही अधिवास सुरक्षित करण्यासाठी वनविभागाकडून सौरक्षण भिंत किंव्हा कुंपण उभारण्यात यावे. अशी मागणी यानिमित्ताने नागरिकांसह वण्यप्रेमिंकडून केली जात आहेत. high risk of wildlife
औद्योगिक नगरी बल्लारपूर शहर आणि लगतच्या परिसरात बॉटानिकल गार्डन, सैनिक शाळा, स्टेडियम सारखी मोठी वास्तू आजघडीला निर्माण झाली आहेत. यामुळे या शहराची ओळख आता निव्वळ औद्योगिक नगरी ईतकंच न राहता, ते लवकरच पर्यटनाचं केंद्रबिंदू म्हणून नावालौकिस येत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह येणाऱ्या पर्यटकांच्याही सुरक्षितेची बाब लक्षात घेणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन ते बल्लारपूर शहरापर्यंत, बामणी, दहेली, लावारी, केम तूकुम, कळमना, आमडी, कोठारी अश्या मुख्य रस्त्यालगतच्या गावाजवळ काटेरी कुंपण अथवा सौरक्षण भिंत उभारल्यास, मानव आणि वन्यप्राणी अश्या दोघांचाही अधिवास सुरक्षित राहील. त्यामुळे परिस्थिती चिघळण्यापूर्वी वनविभागाकडून तत्काळ पावलं उचलली जावी. अशी मागणी, नागरिकांकडून केली जात आहेत. नागरिकांची हि रास्त मागणी पाहता, या मागणीचे समर्थन पर्यावरण प्रेमी, सामाजिक आणि राजकीय संघटना करीत आहेत.
वन्यप्राण्यांचे हल्ले प्रकरण
( १ जानेवारी ते २६ डिसेंबर २०२१ शासकीय नोंदी प्रमाणे)
पशुधन हानी :- ५९४
मनुष्य जखमी :- ४८
हल्यात मृत्यू :- १
वन्यप्राण्यांच्या हल्यातील अनेक किरकोळ घटनांची नोंद सबंधित व्यक्तींकडून केली नसल्याचे वरील आकडे पाहता दिसून येते.
मानव व प्राण्यांच्या सहजिवणासाठी मानवी जीवन आणि वन्य जीवन सुरक्षित ठेवण्याकरीता प्रत्यक्षात कृती करण्याची गरज आहे. दोन्ही सहजीवन एकमेकांशी निगडित आहेत. त्यामुळे नेहमी होणारे हल्ले पाहता, अश्या धोकादायक परिसरात कुंपण अथवा सौरक्षण भिंत उभारण्यात यावी. अशी मागणी आता शहरासह गावखेड्यातून केली जात आहेत.
---------------------------------------
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
बंडू धोतरे
(पर्यावरणप्रेमी, अध्यक्ष इको-प्रो संघटना )
औद्योगिक क्षेत्र तसेच शहरालगतच्या वनक्षेत्रात वाघ-बिबट यांची संख्या वाढली असून, रस्त्यालगत असलेल्या दाट झुडपांजवळ या वन्यप्राण्यांनी आपला नवा अधिवास तयार केला आहेत. त्यामुळे परिसरात स्वच्छता राखणे गरजेचे आहे.
--------------------------------------
सुधीर मुनगंटीवार
( माजी वनमंत्री तथा आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र )
नागरिकांच्या सुरक्षिततेकडे वनविभागाने लक्ष द्यावे. सौरक्षण भिंत उभारण्याची नागरिकांची मागणी रास्त आहे. या मागणी अनुषंगाने वनविभागाला पत्रव्यवहार केला असून, शासनदरबारी हि मागणी रेटून लावू.
------------------------------------
नरेश पुगलिया
(कामगार नेते)
या शहराच्या विकासासाठी पेपरमिल उद्योग समूहाचा सिंहाचा वाटा आहे. औद्योगिक परिसरालगत आणि मुख्य रस्त्यालगत वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेची बाब लक्षात घेता, वनविभागाने योग्य पावलं उचलण्याची नितांत गरज आहे.
------------------------------------
सुभाष ताजने
( सरपंच, बामणी )
गावालगत शैक्षणिक संस्था असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्यात नागरिक, पाळीव प्राण्यांच्या हानी सोबत शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान होत आहेत.
