प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - बामणी (दु) या गावात मागील 15 दिवसापासून वाघ ठाण मांडून बसला असून काही दिवसांपासून त्या वाघाने परिसरात चांगलाच धुमाकूळ माजविला असून त्याला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी सरपंच सहित गावकऱ्यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी शिवनगर येथे राहणाऱ्या चंदन नारनवरे याला tiger attack वाघाने हल्ला करीत ठार केले होते त्या दिवसापासून वाघ बामणी परिसरात संचार करीत आहे. Man eater tiger
त्या नरभक्षी वाघाने आतापर्यंत अनेक गुरे व ढोरांची शिकार केली असून तो गावात कधीही येऊन मानवी शिकार करेल याबद्दल शंका नाही.याकरिता बामणी (दु) सरपंच सुभाष ताजने, शेख जमिल शेख सबदर यांनी मध्य चांदा वनसंरक्षक यांना निवेदन देत तात्काळ वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
