गडचांदुर - हॉटेल व्यावसायिकावर सट्टापट्टी खेळल्याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल झाला होता, पोलिसांनी कारवाई करीत त्यांना जामिनावर सोडले मात्र पोलिसांच्या कारवाईत त्यांचा मोबाईल हा ताब्यात घेण्यात आला होता, तो परत देण्यासाठी तपास करणारे पोलीस हवालदार सुनील मेश्राम हॉटेल व्यावसायिकाला 5 हजारांची मागणी केली, तडजोडीअंती 3 हजार रुपये देण्याचे ठरले मात्र लाचलुचपत विभागाच्या कारवाईत पोलीस हवालदार मेश्राम याला रंगेहात अटक करण्यात आली.
Anti corruption department chandrapur
तक्रारदार हे नांदा फाटा , गडचांदुर , ता . कोरपना , जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असुन त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे . तक्रारदार यांचेवर पोलीस स्टेशन गडचांदुर, जिल्हा चंद्रपूर येथे सट्टापट्टीचा जुगार खेळल्याबाबत अपराध क . ३२३ / २०२१ दिनांक १४ / ० ९ / २०२१ रोजी गुन्हा दाखल असुन त्यामध्ये त्यांचेवर आवाळपुर पोलीस चौकी, पोलीस स्टेशन गडचांदुर येथील पोलीसांनी कारवाई करून त्यांना जामीनावर मुक्त केले आहे. सदर गुन्हयाचे तपासकामी आवाळपुर पोलीस चौकी, पो.स्टे . गडचांदूर येथील पोलीस हवालदार सुनिल मेश्राम यांनी तक्रारदार यांचा मोबाईल ताब्यात घेतला होता. सदर मोबाईल परत देण्याचे कामाकरीता पोलीस हवालदार सुनिल मेश्राम यांनी तक्रारदार यांना Bribe ५००० / - रू . ची मागणी केली. तक्रारदार यांना पोलीस हवालदार सुनील मेश्राम यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र.वि, चंद्रपूर येथील कार्यालयात येवून तक्रार नोंदविली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे श्रीमती शिल्पा भरडे, पोलीस निरीक्षक यांनी गोपनीयरित्या trap सापळा रचला. त्यामध्ये आवाळपुर पोलीस चौकीचे पोलीस हवालदार सुनील मेश्राम, पो.स्टे . गडचांदुर, जिल्हा चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना गुन्हयाचे तपासात ताब्यात असलेला मोबाईल परत करण्याकरीता ५००० / - रूपये लाच रक्कमेची मागणी करुन तडजोडीअंती ३००० / - रूपये लाच रक्कम दिनांक ०३ / १२ / २०२१ रोजी गडचांदूर येथील नायरा पेट्रोल पंपासमोरील झुनका भाकर दुकाना समोरील रोडवर स्वतः स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यावरून त्यांचे विरूध्द पो.स्टे. गडचांदुर, जि. चंद्रपूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Police constable arrested
सदरची कामगिरी राकेश ओला, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, मिलींद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. नागपूर, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात शिल्पा भरडे, पोलीस निरीक्षक, नापोशि नरेशकुमार नन्नावरे, पोशि रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, वैभव गाडगे, चालक पोशि रमेश हाके सर्व ला.प्र.वि. चंद्रपूर यांनी केली.
