प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - आपण स्वच्छ आपला गाव स्वच्छ,आपला गाव स्वच्छ तर आपला जिल्हा स्वच्छ,आपला जिल्हा स्वच्छ तर आपला राज्य स्वच्छ, आपले राज्य स्वच्छ तर आपला देश स्वच्छ. या उक्तीप्रमाणे आपल्या आरोग्याचे रक्षणही स्वच्छताच करीत असते म्हणून मुल तालुक्यातील कोसंबी(मोठी) येथील होतकरु,प्रामाणिक,कर्तव्यदक्ष उच्चशिक्षित सरपंच रवींद्र कामडी यांनी पुढाकार घेऊन समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने त्यांना विश्वासात घेऊन महिला व पुरुषांनी श्रमदान केले तर कोणतेही काम अशक्य नाही. हे करुन दाखविले आणि स्वच्छ ग्राम स्पेर्धेत प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला असून कोसंबी गावाची तपासणी आर.आर.(आबा)पाटील सुंदर ग्राम योजनेअंतर्गत जिल्हा स्तरीय तपासणी पथक दिनांक २९/१२/२०२१ रोज बुधवारला गावात दाखल होणार असल्याने सरपंच रवींद्र कामडी यांच्या पुढाकारात गावातील पुरुष-महिला-युवक एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ग्राम स्वच्छतेसाठी जोमाने भिडले असून ग्राम सचिव सुरज आकणपल्लीवर यांनी सुद्धा कंबर कसून सहकार्य करीत आहेत. याप्रसंगी उपसरपंच सारिका गेडाम,सदस्य मनीष चौधरी,चंदा कामडी,रोशनी मोहूर्ले,अरुणा वाढई, सुवर्णा कावळे, यांनीही झाडू हातात घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करीत आहेत. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत घर,आंगण, परिसर,शाळा, सजावट स्पर्धा,जागतिक हात धुवा दिन रस्ते दुरुस्ती,स्वच्छता सफाई,स्वच्छ जनावरे,आदर्श गोठा,पाणी शुध्दता, सांडपाणी व्यवस्थापन, यासारखे समाजपयोगी कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत असून कोसंबी हे गाव १०० टक्के हागणदारी मुक्त झाले आहे. प्रत्येक कुटुंब नळजोडणी उपक्रमात सहभागी घेतला आहे. गावात शौचालय व्यवस्थापन वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन,श्रमदानातून गाव स्वच्छ, वयक्तिक स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी महिला पुरुष स्वतःहून परिश्रम घेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.