गडचांदूर: गडचांदूर शहरातील माणिकगड सिमेंट कंपनीने जल,वायु,ध्वनी सर्वच प्रकारच्या प्रदुषणात मर्यादा ओलांडली आहे.यामुळे शहरवासीयांना विविध प्रकारच्या जीवघेण्या रोगांनी ग्रासले आहे."सिमेंट उद्योगांनी आमच्या शहरात येऊन संपत्ती कमवायची आणि आमच्याच आरोग्याशी खेळ मांडायाचा" हे कदापि खपवून घेतले जाणार नाही अशी जळजळीत भावना व्यक्त होत असून "ऊठ तरूणा जागा हो,प्रदुषण मुक्तीचा धागा हो" अशी हाक देत Team Movement Against Pollution "टीम मुवमेंट अगेंस्ट पोल्युशन'' गडचांदूरच्या वतीने अचानक चौक माता मंदिर येथील माताराणीच्या साक्षीने माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदुषणाविरोधात 26 डिसेंबर पासून ''स्वाक्षरी अभियानाला'' सुरूवात करण्यात आली आहे. Dust pollution शहरवासीयांमध्ये जनजागृतीच्या उद्देशाने ही मोहीम आगामी वर्षाच्या 9 जानेवरीपर्यंत संपूर्ण गडचांदूरात राबविण्यात येणार आहे. भविष्यातील पिढ्यांच्या काळजीपोटी शहरातील जेष्ठ, प्रौढ, युवक, युवती, लहान बालकांच्या आरोग्यासाठी स्वतःची जबाबदारी समजून नागरिकांनी या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्याचे अनुभवायला आले आहे.आता याविषयी पुढे काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. Air pollution