प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर:- बल्लारपूर शहरात करोडो रुपयाची लागत लावून रस्ते, नाल्या व गल्लीतले रोड बांधण्यात आले होते. परंतु जीवन प्राधिकरणाच्या नळ योजनेमुळे शहरातील संपूर्ण रस्ते नाल्या व गल्लीतील रोड फोडण्यात आले. नगराध्यक्षांच्या व काँग्रेस,भाजपा व इतर पक्ष नगरसेवकांच्या चुकीच्या नियोजनामुळे नगरपरिषदेचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असून याविरोधात वंचित बहुजन आघाडीने नगर परिषदेसमोर खड्ड्यांचे लोकार्पण करून तिव्र आक्रोश आंदोलन केले.
Vanchit Bahujan Aghadi बल्लारपूर नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता असून भाजपाप्रणित नगराध्यक्ष यांच्या गलथान व नियोजनशून्य कारभाराचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. सुधीर मुनगंटीवार मंत्री असताना त्यांनी विकासाच्या नावाने वारेमाप निधीचे वाटप केले. परंतु त्यांनी व त्यांची सत्ता असणाऱ्या नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन न केल्यामुळे व भ्रष्टाचार करून पैसे कमवण्याची ओढ लागल्याने करोडो रुपयांचे रस्ते नाल्या बांधण्यात आले. आणि तेच रस्ते फोडून त्यामध्ये पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले. यामुळे रस्ते बांधण्याकरिता करोडो रुपये वाया गेलेच परंतु रस्ते फोडण्याकरिता सुद्धा आर्थिक निधीचा वापर करण्यात आला. रस्ते फोडल्यामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून नगरपालिका प्रशासन आर्थिक निधीचा गैरवापर करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम करत आहे. वारंवार यासंबंधात निवेदन देऊनही प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीने राजु झोडे यांच्या नेतृत्वात आक्रोश आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. आक्रोश आंदोलनात राजु झोडे यांनी भाऊंनी खड्ड्यांच्या लोकार्पणाला यावे असे आवाहन केले होते. विकासाच्या नावाने लूटमार करून नगरपालिकेच्या व शासनाच्या तिजोरीची लुट करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राजू झोडे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रोश आंदोलनात केले. नगराध्यक्षांचा गलथान कारभार व त्याला साथ देणार्या काँग्रेस, भाजपाच्य नगरसेवकांवर व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे याकरिता आंदोलनकारी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली. सदर आंदोलनात राजू झोडे, सचिन पावडे, नविन डेविड, धिरज बांबोडे,प्रदिप झामरे, जाकिर खान, सचिन थिपे,गौतम रामटेके,सुरेश डेगरे,स्वप्निल सोनटके,छोटूभिई अली, परमानंद भड़के आदि आंदोलनात बल्लारपूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते. Road pit