प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - 26 नोव्हेम्बरला बामणी वनविभागाच्या तपासणी नाक्यावर आर.एस.टिंबर्स बालाघाट, मध्यप्रदेश येथून हैदराबाद येथे जाणाऱ्या ट्रक ला थांबवित त्यामधील सागवनाची चौकशी केली असता, वाहतुकीला आवश्यक असलेले पासिंग हॅमर चे चिन्ह अंकित नसल्याने त्यामधील 283 साग चिरान किंमत 5 लाख 4 हजार 373 रुपये जप्त करण्यात आले होते.ट्रक चालक शेख मसूद शेख ख्वाजामिया रा. निजामाबाद, तेलंगणा याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. Teak
वाहनचालक शेख यांचेवर Illegal Teak Chiran Transport अवैध साग चिरान वाहतूक प्रकरणी वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी पुढील तपासासाठी तपासणी दल गठीत केले, मध्यप्रदेश ला जात तपासणी पथकाने आर.एस.टिम्बर्स याच्या कागदपत्रे व स्टॉक ची तपासणी करीत बालाघाट वनविभागाच्या कार्यालयात अहवाल सादर करण्यात आला.
वाहतूक परवान्यात 259 साग चिरान ची नोंद होती मात्र ट्रक मध्ये 283 नग साग चिरान आढळून आले.
24 अतिरिक्त साग चिरान व ट्रक मधील सागवान हे ओला असल्याने जिवंत सागवृक्षाची तोड केल्याचे अहवालात नोंद करण्यात आले होते.
मध्यप्रदेश काष्ठ अधिनियमनानुसार आर.एस.टिम्बर्स यांचेवर कारवाई करण्यासाठी लेखी अहवाल तयार करण्यात आला. Ballarpur Forest
तपासनी पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या नेतृत्वात वनक्षेत्र सहायक नरेश भोवरे, क्षेत्र सहायक भगीरथ पुरी, वनरक्षक विशाल मंत्रीवार व राकेश शिवणकर यांनी तपासणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करीत अहवाल सादर केला.