प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - माजी अर्थ नियोजन व वन मंत्री मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून विशेष निधी अंतर्गत बल्लारपूर शहरातील मौलाना आजाद वार्डात परिवार किराणा स्टोर जवळील हनुमान मंदिर परिसरात तसेच आजाद चौकातील हनुमान मंदिर परिसरात ग्रीन जिमचे लोकार्पण माजी वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनभैया चंदेल यांच्या हस्ते नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी या वार्डाचे नगरसेविका सौ पुनम मोडक, मेघनाथ सिंग, राजेश दासरवार,प्रवीण मोडक,अब्दुल आबिद, दिनेश कोकुलवार,राजकुमार श्रीवास्तव, प्रकाश गजपुरे, दिगांबर अड्डुरवार,मिथलेश वर्मा,बेबी केशकर, प्रभाताई सरोज,सुमन केशकर, मोहीत पब्बतवार, शेख ईस्माईल, तसेच हरेराम सिंग, रमेश निषाद,रमेश गेडाम, सुधाकर खंडस्कर,राजु लिहीतकर व वार्डातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.