चंद्रपूर/Tech News - जर तुमच्याकडेही अँड्रॉइड फोन असेल तर तुम्हाला या Malware मालवेअर आणि व्हायरसबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे. जोकर मालवेअर पहिल्यांदा 2017 मध्ये ओळखले गेले. हे पुन्हा काही App मध्ये आढळून आले आहे. याविषयी Google वेळोवेळी वापरकर्त्यांना सतर्क करते.
Google ने 2019 मध्ये Joker Malware संदर्भात एक Blog Post ब्लॉग पोस्ट देखील केली होता. ज्यामध्ये Google ने हे मालवेअर कसे टाळायचे ते सांगितले होते. कलर मेसेज नावाच्या अॅपमध्ये जोकर मालवेअर पुन्हा सापडला आहे. हे अॅप तुम्हाला रंगीत आणि नवीन इमोजी देण्याचा दावा करते.
मोबाईल सिक्युरिटी फर्म Pradeo च्या अहवालात असे समोर आले आहे की हे अॅप जोकर मालवेअरने भरले आहे आणि हे ऍप्लिकेशन गेल्या एक वर्षापासून गुगल प्ले स्टोअरवर आहे. मेसेजिंग अॅपमध्ये असलेल्या या मालवेअरमुळे युजर्सना पेड सबस्क्रिप्शन मिळत आहे. Joker malware returns
2017 पासून, Google ने Playstore वरून अशी सुमारे 1700 ॲप्स शोधून काढली आहेत. आतापर्यंत सुमारे 5 लाख लोकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. तुम्ही देखील हे अॅप डाउनलोड केले असेल तर तुम्ही ते डिलीट करा. तुमच्या खात्यातून पेड सबस्क्रिप्शन काही प्रकारे घेतले असल्यास तुमच्या Google Play Store खात्यावर जा.
Google ने कोणते अॅप बनवले आहे ते नेहमी तपासत रहा. • या अॅप्स आणि डेव्हलपरची नावे लक्षात ठेवा, तुम्हाला असे अॅप्स आढळल्यास ते डाउनलोड करणे टाळा.
चांगल्या संरक्षणासाठी तुम्ही एक चांगला अँटी - व्हायरस देखील डाउनलोड करू शकता. ते स्कॅन करेल आणि तुमच्या फोनमध्ये व्हायरस आहे की नाही हे सांगेल.