चंद्रपूर - चंद्रपूर ते नागपूर महामार्गावर असलेल्या प्रतिष्ठानच्या दुकानदारांनी आपले अतिक्रमण मार्गावर आणले असून या अतिक्रमणाचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
काही दिवसांपूर्वी नागपूर महामार्गावर असलेल्या वर्धमान मोटर्सच्या रस्त्यावर असलेल्या दुचाकी वाहनांमुळे अपघात झाला होता मात्र त्यानंतरही मुजोरीने वाहने रस्त्यावर आणण्याचे काम सुरू आहे, रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या व भविष्यात या अतिक्रमनाणे मोठी दुर्घटना टाळता यावी यासाठी प्रतिष्ठान चालकांवर प्रशासनाने कारवाई करावी याकरिता युवासेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे यांनी चंद्रपूर मनपा आयुक्त राजेश मोहिते व चंद्रपूर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक पाटील यांना निवेदन दिले. Yuvasena chandrapur
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देतेवेळी पवन नगराळे, महेश मेश्राम तालुका सन्मवयक, नागेश कडुकर, उपशहर प्रमुख समिर मेश्राम, शिवसेना उपतालुका प्रमुख शार्दुल गणविर, ऍडवोकेट अजितभाऊ पाडें, उपतालुका प्रमुख अमोल मगांम, शुभम रोहनकर, तोसिफ खान उपस्थित होते.
