चंद्रपूर/ गोंडकालीन वैभवशाली परंपरा लाभलेल्या आणि इतिहासाची साक्ष देत असलेल्या चंद्रपूर किल्ल्याची हेरिटेज वॉकच्या माध्यमातून महती सांगण्यासाठी The nectar festival of freedom स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बुधवार ता. 22 डिसेंबरपासून किल्ला पर्यटनाला दिमाखात प्रारंभ झाला.
गोंडकालीन किल्ला-परकोट व ऐतिहासिक स्मारक पर्यटन Heritage Walk 'हेरीटेज वॉक' या इको-प्रोतर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
Eco pro chandrapur
आज बुरूज 4 बगड खिडकी वरून हेरीटेज वॉक या उपक्रमाचा शुभांरभ करण्यात आला. यावेळी चंद्रपूर जेसीआय चे दामोधर सारडा, डॉ. सुशिल मुंधडा व पदाधिकारी, नागरीक व इको-प्रो चे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. नेहमीप्रमाणे आजही कुडकडत्या थंडीत पर्यटनकरिता नागरीक हेरीटेज वॉकसाठी एकत्रीत जमा झाले होते. यादरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गोंडकालीन स्थापत्यकला असलेले किल्ला परकोटाचे बांधकाम, बुरूज-खिडक्या, पादचारी मार्ग तसेच गोंडकालीन इतिहास समजून घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी रामाळा तलावाच्या वरच्या बाजुस असलेल्या किल्ला परकोटाच्या बुरूज क्रमांक 4 वरून किल्ला व तलावाची पाहणी करीत 20 वर्षापुर्वी रामाळा तलाव पर्यटन विकासाच्या वेळेस तयार करण्यात आलेला एकदेउळ ते बगड खिडकी पर्यतच्या मार्गाची पाहणी केली. सोबतच किल्लावरून हेरीटेज वॉक करताना बगड खिडकीपासून तयार करण्यात आलेली संरक्षण भिंत व त्यामधुन तयार होणार पाथ वे व सायकल ट्रॅक बाबत माहीती घेतली. हेरीटेज वॉक सलग सुरळीत-सुरक्षीत व्हावे याकरिता यादरम्यान असलेले अडथळे विषयी माहीती जाणुन घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी चंद्रपूर शहराचा वैभवशाली इतिहास, अनेक गोंडराजे यांच्या पराक्रमाच्या गाथा, रंजक असा इतिहास आहे, अनके वास्तु-स्मारक आहे जे पर्यटकांना आकर्षित करू शकतात. अनेक स्थानिक नागरीकांना याबाबत माहीती नाही, त्यांना सुध्दा या हेरीटेज वॉक उपक्रमातून माहीती मिळत आहे. अशा इतिहासाला उजाळा मिळत असुन, हा हेरीटेज वॉक निश्चीतच चंद्रपूरचे पर्यटन विकासाची संभावना अधिक आहे. ताडोबाला येणाऱ्या पर्यटकांना सुध्दा मोठी पर्वणी उपलब्ध होउ शकते. येत्या काळात शहरातील पर्यटन विकासासाठी पुढाकार घेतला जाईल, असे मत व्यक्त केले.
Tourism
आज झालेल्या हेरीटेज वॉक दरम्यान बगड खिडकी, मसन खिडकी, अंचलेश्वर मंदीर, गोंडराजे समाधीस्थळ, बुरूज चार ते नउ यावरून हेरीटेज वॉक पुर्ण करण्यात आला. यावेळी चंद्रपूर जेसीआयचे अध्यय महेंद्र जोशी, क्रिष्णा सांगानी, नितेश कुकरेजा, उमेश चांडक, अरविंद सोनी, नितिन पुगलिया, तुषार डगली, विक्रम टंडन, रूपेश शर्माआदी पदाधिकारी तसेच इको-प्रो चे नितीन रामटेके, धर्मेद्र लुनावत, रवी गुरनुले, अब्दुल जावेद, संजय सब्बनवार व अन्य सदस्य सहभागी झाले होते.
सदर उप्रकमाचे आयोजन इको-प्रो संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, भारतीय पुरातत्व विभाग व चंद्रपुर जेसीआय यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
